Thursday, August 23, 2012

प्रेम प्रेम प्रेम

नेहमीच विचारायची ती मला
का प्रेम करतो तू एवढं
सागराच्या खोली एवढं
का ओढून घेतो मला
सागराच्या लाटा एवढं

नेहमीच सांगायची ती मला

हिप्नोटाइज करतोस तू मला
स्वप्नातही माझ्या
फक्त तूच का दिसतो मला

वाटायच सांगाव तिला

अग वेडे
प्रेम काय सांगून केले जाते
बुडायला काय पाणीच लागतं
अथांग काय फक्त सागरच असतो
अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर 
चंद्रही भारावतो ह्या लाटाना
म्हणूनच त्याही उफाणतात
पोर्णिमा आणि अमावस्येला

प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत  

तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो
तुझ्या असण्यातच आता माझं असण असते
म्हणूच सांगतो
माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत 

Monday, April 23, 2012

तुझी आठवण !

ही अखेरची तुझी आठवण !

यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार नाही....

... यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं
माझ्या मनात बरसणार नाही....

यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस माझ्यामनाच्या अंगणात
रिमझिमणार नाही....!

तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा
जसा स्वीकारला होता
तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर...!

म्हणूनच हे अखेरचे काही अश्रू,
फक्त तुझ्यासाठी....
पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली
तुझ्यासाठी जमणार नाहीत.......

आणि हे अखेरचे काही शब्द
फक्त तुझ्यासाठी.....
यापुढे माझ्या कविता
तुझ्या आठवणी मागणार नाहीत....

यापुढे कधीही माझ्या कविता
तुझ्यासाठी असणार नाहीत....

ही अखेरची तुझी आठवण....
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार नाही.

Friday, March 16, 2012

अजुनी तशीच मी

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप बोलावसं वाटत,
नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत…
तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुलाच पाहावस वाटत,
नाहीतर डोळे मिटून शांत बसावस
वाटत…
तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप हसावसं वाटत,
नाहीतर उदास रहावस वाटत…
तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत,
नाहीतर मनात सगळं दुखं, दाबून
ठेवावस वाटत…
तू बरोबर असतोस तेव्हा,
तुझ्याबरोबर पावसात भिजावस
वाटत,
नाहीतर खिडकीतूनच, पडता पाऊस
पाहावस वाटत…
तू बरोबर असतोस तेव्हा,
जगावसं वाटत,
नाहीतर जग सोडून जावस वाटत…
तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत,
नाहीतर फक्त तुलाच आठवावस
वाटत…
नाहीतर फक्त तुलाच आठवावस
वाटत…

Saturday, February 18, 2012

मैत्री अशी असावी

मैत्री तुझी अशी असावी,
आयुष्यभर सोबत राहावी,
नको कधी त्यात दुरावा,
नेहमीच नवा फ़ुलोरा,
मैत्री आपुली अशी असावी,
......सर्वांना एकत्रित आणावी,
हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजून घ्यावे,
मैत्री आपण अशी जगावी,
एकमेकांचा आधार असावी,
सुख दुखात नेहमी सोबत असावी,
असे हे आपले मैत्रीचे नाते नेहमीच जपावे,
तुझी मझी मैत्री अशी असावी