वेळ होती
तुझी देण्याची
माझी घेण्याची
तुझ्यात एक परीस होता
मला तो गवसला
तुला त्याचा थांग सुध्दा नव्हता
मी मात्र त्याला जपलय,
कारण....
मला सोनं नकोय,
मला परीस हवाय
वाटतं तू जगाचं सोनं करावंस
पण ............
एक भीतीही वाटते....
एक दिवस तूच सोनं झालास
अन मला महागलास....?
सोन्याचा भाव वाढतच असतो
आणि जग सोन्याच्या मागे धावतं
मी या रस्सीखेचीत मागं पडले तर ?
कारण,
मी फक्त एक मन आहे
तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारं.........